लिंबूने आणले डोळ्यात अश्रू- बटाटे भाजीपाल्याचे दर वाढल्यावर किंवा कांदा दर वाढला तर डोळ्यात अश्रू आणत असतात मात्र आता लिंबूने डोळ्यात अश्रू आणले आहेत कारण लिंबूचा दर गगनाला भिडलेला आहे.
बेळगावच्या बाजारात लिंबाच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे नागरिक लिंबू खरेदी करण्यास नकार देत आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे.दोन ते तीन रुपयांना रिटेल बाजारात मिळणारा लिंबू आठ ते दहा रुपयांना मिळत आहे.
लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत, कडक उन्हात जनतेकडून लिंबू फळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने लिंबुंची जितकी मागणी वाढली त्यापेक्षा अधिक पटीने दरही वाढत असून ते खरेदी करण्यास जनता कचरत आहे.
बेळगावातील भाजी बाजारात लिंबू फळाचे भाव वाढले असून आता आकारानुसार लिंबाचा भाव ठरवणारे विक्रेते त्रासदायक ठरत आहेत.
त्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. लिंबाच्या फळाची किंमत नगाच्या आधारावर नव्हे तर आकारानुसार निश्चित केली जात आहे.यामुळे कांद्याने नव्हे तर लिंबुने डोळ्यात पाणी आणले आहे.