बेळगावळगाव शहरात शनिवारी अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली बेळगाव तर आज शहरातील बहुतांश मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कंग्राळ गल्लीत हनुमान जयंती
बेळगाव येथील कंग्राळगल्लीतील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी हनुमान मूर्तीचे भक्ती भावाने पूजन करण्यात आले. शंकर बडवाण्णाचे यांनी आरती म्हटली.गल्लीतील उपसरपंच अनंत राव जाधव,माजी महापौर मालोजी अष्टेकर ,बाबूराव कुट्रे धामणेकर,पप्पूजाधव,महादेव अ बडवाण्णाचे किरण ल सांबरेकर, गजानन बडवाण्णाचे, महेश बडवाण्णाचे ,गुंड कंग्राळकर महेश इंगोले,दिगंबर कातकर अभिजीत करेगार,साईट मोरे स्मितीन सांबरेकर,मंजूनाथ सांबरेकर, विनायक पाटील, स्वराज सांबरेकर, शब्द जाधव अवधूत हुरडेकर,वेदान्त कातकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी गल्ली तील ज्येष्ठ व्यायामपट्टू बिंदू उर्फ सदानंद बडवाण्णाचे यांचा व्यायामशाळे
च्या वतीने रोख रक्कम आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
हनुमान जयंती निमित्त गदा पूजन-पैलवानाचा सत्कार
हनुमान जन्मोत्सव निमित्य सनातन संस्था हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चव्हाट गल्ली येथील हनुमान मंदिरात बजरंगबली चांदीच्या गदा पूजन करण्यात आली.यावेळी अंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळाडू पैलवान अतुल शिरोळे व हिंदुत्वनिष्ठ मारुती सुतार यांच्या हस्ते हनुमान चांदीच्या गदाची पूजन करण्यात आले,तसेच हिंदूराष्ट्र स्थापन लवकर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात प्रार्थना करून साकडे घालण्यात आले.
यावेळी पैलवान अतुल शिरोळे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व दि.17 रोजी मुचंडी यात्रेनिमित्य गावात होणाऱ्या कुस्ती सामन्यास पैलवान अतुल यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बेळगांव सनातन संस्थेच्या समन्वयक सौ उज्वला ताई गावडे यांनी प्रार्थना व सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्पर गुरु जयंत बाळाजी आठवले गुरुजी यांचा संदेश उपस्तित भक्तांना दिला,यावेळी अनेक भक्त उपस्थित होते.
*घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम सम्पन्न*
बेळगाव -हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला.
शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन झाले त्यांनी हनुमंताच्या जन्माची कथा कीर्तनातून सादर केली, सूर्योदयास जन्मकाल व आरती झाल्यानंतर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोणामुळे बंद असलेल्या महाप्रसादाचे यंदा आयोजन करण्यात आले होते. अनगोळ येथील भक्त श्री गोपाल
होंगल यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आला. ज्याचा परिसरातील हजारो भाविक स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. याप्रसंगी महाप्रसाद देणारे गोपाल होंगल, महाप्रसाद बनविणारे ज्योतिबा कोले व वार्ड नंबर 41 चे नगरसेवक श्री मंगेश पवार यांचा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. महाप्रसादाचे निमित्ताने आज अनेक उद्योजक व महनिय व्यक्तीनी मंदिरास भेट देऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. अनेकानी सढळ हस्ते देणग्याही दिल्या. याप्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष कुलदीप भेकेणे, सेक्रेटरी प्रकाश महेश्वरी, सदस्य बाबुराव पाटील, गोपाळराव बिर्जे, नेताजी जाधव ,रघुनाथ बांडगी, संभाजी चव्हाण, अनंत लाड,सुनिल चौगुले यांच्यासह विक्रम चिंडक, के ए साळवी व पुजारी बालु किल्लेकर आदि उपस्थित होते.