बेळगाव आणि गोव्याचे नाते फार जुने आहे .बेळगावातील नागरिक गोव्यात पर्यटनासाठी येतात आणि गोव्याचे नागरिक खरेदीच्या निमित्ताने प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस बेळगावला हमखास भेट देतात.
याच नात्यातून बेळगाव आणि महाराष्ट्र वासियांना पर्यटनाची चांगली संधी गोव्यात उपलब्ध करून देण्याची ग्वाही गोवा राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खुंटे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यामध्ये आपले जाळे विस्तारलेल्या प्रतीक टूर्स चे संचालक प्रतिक गुरव यांनी आज यांची गोवा येथे भेट घेतली. यावेळी प्रतिक टूर्स च्या एकंदर टूर प्रकल्पांची माहिती त्यांना देण्यात आली. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या टुर्स आयोजित करून कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना आजवर पर्यटन सेवा देत असल्याचे प्रतिक गुरव यांनी सांगितले.
दरम्यान या सेवेला आणखी संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे. गोवा पर्यटन खात्यात चांगल्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना विशेष स्थान देऊन योग्य त्या सुविधा पुरविल्या जातात.
या सर्व प्रकारच्या सुविधा देण्याची ग्वाही यावेळी पर्यटन मंत्र्यांनी दिली आहे. बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंके व महेश चतुर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.