Monday, March 10, 2025

/

संभाव्य चौथ्या लाटेसाठी सर्वती खबरदारी : मंत्री सुधाकर

 belgaum

नवी दिल्ली आणि इतर राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

बेंगलोर येथे आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, दिल्लीसह अन्य कांही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली असून हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच वैद्यकीय तपासणी यंत्रणा अधिक काटेकोर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी सक्तीने फेसमास्क घालण्याची सूचना करण्यात आली आहे.

अलीकडे सभा-समारंभात लोकांनी मास्क घालणे सोडून दिले आहे. मात्र असे करून चालणार नाही, मास्क घालण्याची खबरदारी सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे. खबरदारी म्हणून राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आवश्यक पावले उचलण्यात आली असून लोकांनी देखील सावधगिरी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

त्याचप्रमाणे एकंदर कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने राज्यात आवश्यक पावले उचलली असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.