बेळगावच्या सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या मुंबई स्थित एका फायनान्शिअल कंट्रोल असिस्टंटला गजाआड केले आहे.भव्य हिरेन देसाई वय 25 रा. मुंबई असे त्याचे नाव असून सदर फायनॅन्सीयल कंट्रोलरने बेळगावच्या एका कंपनीला बनावट प्रमाणपत्र दाखवत साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
यासंदर्भात देसुर क्रॉस इथल्या एमजी ऑटोमॅटिक बस कोच प्रा. लिमिटेड या कंपनीचे प्रकाश सर्वी यांनी सीएन पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती त्यानुसार सीईएन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भव्य हिरेन देसाई यानेबनावट कागदपत्रेपत्रे सादर करून कंपनीची4 कोटी 41 लाख रक्कम आर टी जी एस करुन आपल्या खात्याला घेतली होती या शिवाय एम जी ग्रुप कंपनीला आलेली रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली होती या फसवणुकी विरुद्ध बेळगावच्या सी ई एन पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती.
17 मार्च रोजी भव्य हिरेन देसाई विरुद्ध बेळगाव पोलिसांनी एल ओ सी आदेश जारी केला होता त्यानुसार देसाई हा 24 मार्च रोजी मुंबई विमान तळावरून शारजाह पलायन करण्याच्या तयारीत होता त्यावेळी विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं होतं बेळगाव पोलिसांना याची माहिती 25 मार्च रोजी देसाई याला मुंबई तून अटक करून बेळगावला आणण्यात आले होते.
25 रोजी देसाई याला न्यायालयात हजर करून दहा दिवसाची पोलिस कोठडी घेण्यात आली होती त्यामुळे पाच एप्रिल रोजी दहा दिवस पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्यांना जे एम एफ सी तृतीय न्यायालयात हजर करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
सी ई एन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मुंबईत जाऊन देखील चौकशी केली होती आणि देसाई याचे सर्व खाती सीज केली आहेत त्यांनी विविध खात्यावर जमा करून घेतलेली जवळपास दोन लाख कोटी 65 लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सीएन पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.