हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा तिढा वाढला असून त्याची मला कल्पना आहे. या प्रकरणाचा मी अभ्यास केला आहे. तेंव्हा लवकरच सामोपचाराने चर्चेतून योग्य तो तोडगा काढला जाईल. दरम्यान बायपासचे काम बंद ठेवले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे रण पुन्हा पेटले आहे. कालच पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेल्या सदर रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. परिणामी पोलीस -शेतकरी संघर्ष पुन्हा पेटला आहे.
यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. त्यावेळी बायपास संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक मोठे दिलासादायक आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
हालगा -मच्छे बायपासच्या तिढ्याचा आपण अभ्यास केला आहे. तेंव्हा लवकरच चर्चेतून याबाबत तोडगा काढूया. दरम्यान शेतकऱ्यांचे अटक सत्र बंद करण्याची सूचना मी पोलिसांना देणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी शेतकऱ्यांनी हालगा -मच्छे बायपास मुळे पोलिसांकडून शेतकऱ्यांना वर होणारा अन्याय आणि सुपीक जमिनीचे होणारे नुकसान याबाबत माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा तिढा खूपच वाढला आहे. तेंव्हा सामोपचाराने चर्चेतून यावर तोडगा काढला जाईल. तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्यास सांगितले जाईल, आणि पोलिसांनीही धरपकड करू नये असे आश्वासन दिल्याचे शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.