Monday, May 6, 2024

/

भाजप आणि आर एस एस ने जनतेत तेढ निर्माण केलाय- हरिप्रसाद

 belgaum

राज्यातील नागरिकांची दिशाभूल करत जातीय तेढ निर्माण करण्यावर भाजपने मोठे प्रयत्न चालविले आहेत त्यामुळे सध्या सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालला आहे परिणामी जर असेच पुढे सुरू राहिले तर राज्यात मोठे उन्माद माजेल त्यामुळे हे वेळीच रोखणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते बी के हरिप्रसाद यांनी म्हटले आहे

धारवाड, कोलार आणि रायचूर येथील अल्पसंख्याकांवर हल्ले करण्यात आले आहेत. हे हल्ले आरएसएस आणि भाजपने घडविल्याचे निदर्शनास आले आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला बेळगाव येथील काँग्रेस भवन मध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

नागरिकांमध्ये तेढ निर्माण करणे ही भाजपची एक उत्तम खेळी आहे. दलित, महिला, मागासवर्गीयांवर अत्याचार होत आहेत. आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न झाला. अल्पसंख्याकांवर थेट हल्ले. अनेक लोकांच्या उत्थानासाठी काम करायचे आहे. तो मानवतेचा एक भाग आहे. या कामाचा निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.Hari prasad

 belgaum

भाजपने आतापर्यंत केवळ आपल्या हितासाठी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असून याकडे आता जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे. लहान सहान गोष्टीत राजकारण करून आपली सत्ता टिकविण्याकरिता मोठा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे याकडे यापुढे भाजप सत्तेत येईल असे मला वाटत नाही. त्यांना चांगला धडा जनतेने शिकवावा असे ते म्हणाले.

आर एस एस आणि भाजपने जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला असून त्यामुळेच दंगे वाढले आहेत. मागील काही काळापासून ही प्रकरणे वाढतच आहेत. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता काँग्रेस हा पर्याय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.