Friday, January 3, 2025

/

बेळगाव युवा सेनेने केलं वरून सरदेसाई यांचे भव्य स्वागत

 belgaum

शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आज सोमवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी बेळगाव युवा सेनेतर्फे त्यांचे भव्य हार्दिक स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारास जाण्यासाठी महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव व युवा नेते वरूण सरदेसाई यांचे मुंबईहून हवाईमार्गे आज सोमवारी बेळगावला आगमन झाले. यावेळी बेळगावच्या युवा सेनेतर्फे त्यांचे लक्षवेधी स्वागत फलक उभारून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आपल्या नेत्याला भेटण्यासाठी उपस्थित युवा सेना कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्साही कार्यकर्त्यांनी वरूण सरदेसाई यांच्या सोबत फोटोसेशनही केले.Yuva sena bgm

स्वागत समारंभानंतर सरदेसाई यांनी बेळगावच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बेळगावातील युवासेनेच्या कार्याची थोडक्यात माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे लवकरच बेळगाव शहरात युवा सेनेची अधिकृत स्थापना केली जाईल, असे जाहीर केले.

त्याचप्रमाणे बेळगाव युवा सेना पदाधिकारी निवडीप्रसंगी ज्यांनी प्रारंभापासून प्रामाणिक परिश्रम व कार्य केले आहे अशा कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल, असेही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी विनायक हुलजी, महेश मजुकर, वैभव कामत, राधेश शहापूरकर, अवधूत कंग्राळकर, तेजस लगाडे, प्रतीक देसुरकर, अद्वैत चव्हाण -पाटील, प्रणव बेळगावकर, विजय मोहिते, नील तवनशेट्टी, भारत पाटील, राज देसाई, मयांक पावशे, संकेत लोहार, प्रथमेश पवार, जीवन जैस्वाल, सोमनाथ सांवगावकर, नागराज संजी, सुरज आप्पाजीचे, शेखर कुडचीकर, श्रेयश शिरोळकर, रितेश पावले, दीपक सनदी, मल्हारी बाळेकुंद्री आदी युवा सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.