सोमवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ फुटबॉलपटू महावीर मधुकर लेंगडे वय 47 यांचे गुरुवारी ७ एप्रिल रोजी गोवा येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, एक बहीण,एक भाऊ , असा परिवार आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचा मृतदेहदेह बेळगावला येत आहे. कॅम्प मधील सेंट पॉल हायस्कूलचा महावीर लेंगडे हा प्रसिद्ध फुटबॉलपटू म्हणून गाजला होता.
राॅयस्टन गोम्स स्मृती फुटबॉल स्पर्धा, फादर एडी स्मृती फुटबॉल स्पर्धा, बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक फुटबॉल स्पर्धा, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयांमधून महावीर लिंगडे यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या.
धारवाड विद्यापीठ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा आणि बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बेळगाव जिल्हा वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेत त्यांनी टी. एफ. ए. या फुटबॉल संघातून अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यांच्या निधनाने फुटबॉलशौकिनांनी हळहळ व्यक्त केली आहे.