Thursday, April 25, 2024

/

भिक्षूकेचा बलात्कार करून खून करणारा गजाआड

 belgaum

बेळगावात सुमारे वर्षभरापूर्वी घडलेल्या एका मनोरुग्ण भिक्षुक महिलेच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा छडा लावण्यात माळमारुती पोलिसांना यश आले असून त्यांनी एकाला अटक केली आहे.

रफिक चौरंगवाले (वय 48, रा. हुबळी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. बेळगाव शहरातील अमननगर येथे गेल्या जून 2021 मध्ये एका मनोरुग्ण भिक्षुक महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती.

याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी कसून तपास करून देखील पोलिसांना यश येत नव्हते.

 belgaum

मात्र अखेर नुकतेच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रफिक चौरंगवाले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माळमारुती पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.