स्विमर्स क्लब बेळगावचा जलतरणपट्टू कु. अनिश अजय पै याने महाराष्ट्र रत्नागिरी जवळील देवरान ‘युवा गेम्स 2022 मध्ये’ उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
19 आणि 20मार्च रोजी या स्पर्धा झाल्या होत्या त्यात अनिश याने कौतुकास्पद कामगिरी करत स्विमिंग मध्ये अनेक पदक मिळवली आहेत.
200 मीटर वैयक्तिक मिडले – रौप्यपदक
100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक- रौप्यपदक
100 मीटर बॅक स्ट्रोक- कांस्य पदक
युवा खेळाडू अनिश याला अजिंक्य मेंडके,अक्षय शेरेगार,नितीन कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांनी के एल ई जे एन एम सी स्विमिंग पूल मध्ये ट्रेनिंग देत आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
माजी खासदार प्रभाकर कोरे,उमेश कलघटगी,प्रसाद तेंडोलकर,सुधीर कुसाने आणि आनंदेश्वर पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.