ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने पोलीस चौकशीवर लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी माजीआय पी एस अधिकारी आपचे राज्य प्रवक्ते भास्कर राव यांनी केली.
बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत राव म्हणाले की नोकरशाही विधीमंडळाच्या दबावाखाली काम करत आहे थेट मंत्र्यांवरच आरोप असल्याने अश्या स्थितीत पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. यासाठी या प्रकरणी कोर्टाने चौकशीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे .
ठेकेदार संतोष पाटील यांनी 108 कामे पूर्ण केली आहेत मात्र त्याच्या बिलाची पूर्तता करण्यासाठी नाहक छळ करण्यात आला या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. या केस मध्ये पोलिसांत गुन्हा नोंद झालाय अश्या प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांकडून तात्काळ अटक केली जाते मात्र या केस मध्ये असे काही घडले नाही या गोष्टी वरून आपण या प्रकरणी पोलिसांवर किती दबाव आहे आपण समजू शकतो असेही राव म्हणाले.
ठेकेदार संतोष पाटील यांनी हिंडलगा ग्राम पंचायत व्याप्तीतील कामे पूर्ण केली आहेत ही बाब स्पष्ट आहे यासाठी सरकारने त्याच्या कुटुंबियांना बिल देण्याचे आश्वासन द्यावे मात्र सरकार इतकं क्रूर का वागत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजप आणि काँग्रेस दोघेही ऍडजेस्टमेंटचे राजकारण करत आहेत असा आरोप करत राव यांनी भाजप भ्रष्टाचारामध्ये मोठा फायदा करून घेत असल्याचाही आरोप केला.
लोकांचा विकासात्मक आणि स्वच्छ प्रतिमेची सरकार बनवण्याचा कल दिल्ली आणि पंजाब जनतेने दाखवून दिलाआहे. राज्याचा कर आणि कर्ज न वाढवता मोठ्या प्रमाणात अरविंद केजरीवाल यांनी विकास करून दाखवला आहे कर्नाटकाचे जनतेलाही तशाच सरकारची गरज आहे असं त्यांनी व्यक्त केली.आपचे विभागीय राजीव टोपण्णावर आपचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील हे उपस्थित होते