भरधाव टिप्परने दिलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काँग्रेस रोड पहिल्या रेल्वे फाटका जवळ घडली आहे.
विजय परशुराम नाईक वय 35 रा.ब्रह्मदेव नगर उध्यमबाग असे असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता भरधाव टिप्परने त्याला ठोकर दिली.
या ठोकरीने विजय दुचाकीवरून खाली खाली पडला आणि टिप्परच्या चाकात सापडला . या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयचा मृत्यू झाला.
विजय हा लक्ष्मी टेक येथे पाणीपुरवठा विभागात खासगी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते .रहदारी दक्षिण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.