Thursday, March 28, 2024

/

वॅगनारची झाडाला धडक : एक ठार, 3 जखमी

 belgaum

मुरगोडनजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वॅगनार कारगाडीने झाडाला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण जखमी तर 1 जण ठार झाला. जखमी आणि मयत इसम कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड (ता. कागल) गावचे रहिवासी असल्याचे समजते.

संजय जयसिंगराव चौगुले (वय 56) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नांव असून जखमींची नावे नीलांबरी संजय चौगुले शीला, जयसिंगराव चौगुले (वय 80) आणि अनिल ज्ञानदेव गुज्जर (वय 40) अशी आहेत.

हे सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड (ता. कागल) गावचे रहिवासी असल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार सौंदत्तीहून भरधाव वेगाने मुरगोडकडे जाणाऱ्या वॅगनार कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने (क्र. एमएच 09 सीएम 5822) थेट रस्त्याशेजारील झाडाला धडक दिली.

 belgaum

धडक इतकी जोराची होती की संजय चौगुले जागीच ठार आणि इतर तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याबरोबरच मदत कार्य हाती घेतले. सदर अपघाताची कागल पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.