बेळगाव सहभाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात ज्या ज्या वेळी की झाली आहे त्या त्या वेळी समोरच्या राष्ट्रीय पक्षाचे धाबे दणाणले आहेत आणि सीमा लढ्याला चळवळीला बळकटी मिळाली आहे बेळगाव तालुका समितीमध्ये एकी झाल्यानंतर त्याचे लोण खानापूर पसरले खानापूर तालुका समितीत देखील एकी झाली या बेळगाव तालुका समितीतील एकी मुळे समोरच्या राष्ट्रीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत त्याचीच पुनरावृत्ती खानापूर तालुक्यातील होत आहे.
गेल्या 2018 साली विधानसभा निवडणुकीवेळी फुटीमुळे म. ए. समितीचा पराभव झाला. त्यानंतरही राजकीय स्वार्थापोटी काहींनी चळवळीत कायमची फूट ठेवण्याचा कुटील डाव आखला होता. मात्र निष्ठावंतांनी आता हा डाव उधळून एकीची वज्रमूठ केली आहे. बेळगाव पाठोपाठ खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत गुरुवारी एकी झाली. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची पुढील वाटचाल आता ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. तब्बल चार वर्षाच्या बेदिलीनंतर एकच ध्येय समोर ठेवणारे मात्र वेगवेगळ्या गटाने कार्यरत असणारे कार्यकर्ते एकत्र आले असे असले तरी येत्या काळात समिती समोर उभी असलेली आव्हाने मोठी आहेत. चळवळीतील अस्थिरतेमुळे राष्ट्रीय पक्षांनी पाळेमुळे घट्ट केली असून यापुढे जनमत वाढविण्यासाठी लोक जागृती अत्यावश्यक आहे.
नियोजनबद्ध कार्य करण्याचा अनुभव असलेले डझनभर नेते चळवळीत असताना परकीयांवर स्वकीयांचे देखील कारस्थान रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. येत्या काही महिन्यात निवडणुकीचे वारे वाहू लागतील. त्या अनुषंगाने तरुणांची नवी फळी पुढे आणणेही फायद्याचे ठरणार आहे. तसेच ज्येष्ठांनी तरुणांच्या खांद्यावर जबाबदारी देऊन केवळ सल्लागाराची भूमिका बजावल्यास चळवळीत नवचैतन्य निर्माण होऊन बळकटी येईल, यात शंका नाही.
दरम्यान समितीमधील एकीबद्दल बोलताना पदाधिकारी मारुती परमेकर यांनी चळवळीतील प्रत्येक जण महत्त्वाचा असून त्याच्या विश्वासावरच चळवळ जनमानसात आहे. आमच्यातील मतभेदांना मूठमाती देऊन आम्ही सर्वजण एकत्र आलो ते केवळ चळवळीसाठी. आता येत्या काळात सामूहिक विचारातून लढ्याची पुढील दिशा ठरवू, असे सांगितले. यशवंत बिर्जे म्हणाले की, मराठी भाषा संस्कृती आणि हक्कासाठी लढण्यास आम्ही एकवटलो आहोत. आमच्यातील फुटीमुळे राष्ट्रीय पक्षांचे फावले होते असे सांगून येत्या काळात समितीचा लढा संपुष्टात आणू इच्छिणाऱ्यांची दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार करू. आव्हाने मोठी असली तरी ती पेलण्याची क्षमता आहे, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सदानंद पाटील यांनी आम्हीच निष्क्रिय आणि उदासीन राहिल्याने गेल्या चार वर्षात प्रशासनाकडून कानडीकरण्याचे आराखडे आखले गेलेत. समितीतील एक्यामुळे नवी ऊर्जा मिळाली असून अन्यायाविरुद्ध पेटून उठू, असे स्पष्ट केले.