174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष पदी तर मानद कार्यवाह पदी रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह पदी लता पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवडीचा ठराव अभय याळगी यांनी मांडला तर प्रा. विनोद गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सुनीता मोहिते आणि आय जी मुचंडी यांनी मागील कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.यावेळी कार्यकारिणी सदस्य गोविंदराव राऊत, अनंत जांगळे, अनंत लाड प्रताप पाटील आदी उपस्थित होते.