दडडी-मोहनगा येथील यात्रेला गेलेल्या तिघा मित्रांचा दुचाकी अपघात झाला होता. त्यामध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्याची गरज असताना ही बाब अन्य दोन मित्रांनी लपवून ठेवली. अश्या प्रकारे दडडी येथील खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.आठ दिवसापूर्वी बळेकुन्द्री कुर्द येथील सदानंद इरय्या कुलकर्णी(33)हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दद्दी येथील शाळू च्या पिकात सापडला.
त्याच्या आईने आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार यमकनमर्डी पोलीस स्थानकात दिली.राजू गडागय्या हिरेमठ(50),संतोष ककती(25)व सदानंद हे तिघेजण एकाच दुचाकीवरून दद्दी- मोहनग यात्रेला गेले होते.यात्रेहून परतताना नागनूर केएम येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने तिघेही रस्त्यावर पडले.राजू व संतोष यांना किरकोळ दुखापत झाली पण सदानंद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात्रेत माध्यप्राशन केल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते.
सदानंदची हालचाल बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर उर्वरित दोघांनी त्याला बाजूच्या पिकात उचलून ठेवले दोघेही घरी निघून गेले .ही बाब त्यांनी पोलिसांना तपासात सांगितली त्यानंतर हा खून नसून अपघात असल्याचे स्पष्ट झाले. आता त्या दोघांवर माहिती लपवून ठेवल्याचा गुन्हा दाखल आहे.सदानंद हा आपल्या मित्रासमवेत 17 फेब्रुवारी रोजी मोहनग-दद्दी येथील भावकेश्वरी देवी यात्रेला गेला होता.
मात्र त्यानंतर तेथून तो पुन्हा घरी परातलाच नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध चालविला होता दुसऱ्या दिवशी आईने त्याच्या मोबाईल वर संपर्क केला,परंतु तो स्विच ऑफ आला वाट पाहून त्याच्या आईने मारिहाल पोलीस स्थानकात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
बुधवारी दडडी नजीक मृतदेह आढळून आल्याने आई महादेवी यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार यमकनमर्डी पोलीस ठाण्यात दिली