Friday, December 27, 2024

/

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक*

 belgaum

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक*

*राज्याध्यक्ष सीमाकवी रवी पाटील उपस्थित राहणार*

बेळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदची उद्या बुधवार दि . 23 मार्च रोजी पुरुष व महिला कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.

पहिले राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२० रोजी मराठा मंदिर येथे भरविण्यात आले . त्यानंतर लॉक डॉऊन सुरु झाले . सन २०२१ ला ऑनलाईन संमेलन घेतले . *सन् २०२२ यावर्षीचे तिसरे राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन* आयोजनासंदर्भात नार्वेकर गल्ली येथील सुप्रसिद्ध डी.बी.पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजत बैठक आयोजित करण्यात आली आहे .
अभामसा परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी.बी.पाटील , सचिव रणजीत चौगुले व महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे -पाटील तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष महादेव चौगुले व मार्गदर्शक शिवसंत संजय मोरे व एम. वाय. घाडी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे .

Sudhir chavan
या बैठकीला अभामसाप कर्नाटक राज्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव ग्रामीण सीमाभागात मराठी साहित्य संमेलन भरवत आहेत.
मराठा मंदिर येथे भरविले जात असलेले बेळगावकरांना वाटते की , मराठी माणसांचे मानबिंदू असलेले अभामसा परिषदेचे बेळगाव मराठी साहित्य संमेलन कधी भरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.