शहाजीराजांनी स्थापन केलेल्या मराठा समाजाच्या मठाचे स्वामी म्हणून मंजुनाथ स्वामी यांचा पट्टाभिषेक नुकताच झाला. कर्नाटक परिसरात पसरलेला मराठा समाज एकसंघ रहावा, यासाठी शहाजीराजांनी मराठा समाजाचे धार्मिक अधिष्ठान निर्माण केले. त्या धर्म गादीवर नवीन स्वामींची नियुक्ती झाल्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथील जत्तीमठ येथे मराठा समाजातील प्रमुखांची प्राथमिक बैठक संपन्न झाली.
बैठकीत होदीगिरी येथील शहाजी राजांच्या समाधीस्थळाची भेट घेणे, त्याच्या विकासाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणे, त्याच बरोबर कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत बेळगाव येथे मंजुनाथ स्वामी यांचा भव्य सत्कार करणे याविषयी सर्वानुमते ठराव करण्यात आले.
मराठा समाजातील दिग्गज लोकांना निमंत्रण देऊन मराठा समाजाच्या विकासाला चालना देणे व येथून पुढे ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाजाच्या बैठका घेण्याचे ठरविण्यात आले. सर्व समाज एकजिंनसी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मराठा समाजाच्या इतर अडीअडचणी बाबत उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले यावेळी किरण जाधव, गुणवंत पाटील,माजी महापौर शिवाजी सुंठकर , रमाकांत कोंडुस्कर,दत्ता जाधव,महादेव पाटील, सागर पाटील,सुनील जाधव, शंकर बाबली, संजय सातेरी,चंद्रकांत कोंडुस्कर, रेणू किल्लेकर,विजय भोसले,सुहास किल्लेकर,मनोहर हलगेकर,साधना पाटील शिवानी पाटील , सुनिल बोकडे सह अन्य उपस्थित होते.
प्रास्ताविक गुणवंत पाटील यांनी केले तर बैठकीचा समारोप सुनील जाधव यांनी केला.