बेळगाव शहरात दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज भेट देऊन आशीर्वाद घेतला.
सुरुवातीला ट्रष्टींनी राज्यपालांचे आगमन होताच स्वागत केले त्यानंतर गेहलोत यांनी मंदिरात आरती केली.कर्नाटकचे राज्यपाल पहिल्यांदाच श्री कपिलेश्वर मंदिरला भेट देत असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली होती.
यावेळी कपिलेश्वर मंदिर विश्वस्थांच्यावतीने राज्यपाल गहलोत यांचा फेटा व शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कपिलेश्वर मंदिरचे विश्वस्थ सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, राजू आदी उपस्थित होते.
दरम्यान सांस्कृतिक बेळगावमध्ये राज्यपालांचे आगमन
सांस्कृतिक नगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बेळगाव शहराच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या कर्नाटकच्या माननीय राज्यपाल थावरचंद गहलोत यांचे आज दुपारी सांबरा विमानतळावर सहर्ष स्वागत करण्यात आले.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर आज दुपारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी राज्यपाल गहलोत यांचे सहर्ष स्वागत करून सन्मान केला. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे आयुक्त प्रीतम नसलापुरे, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे (व्हीटीयू) कुलगुरू प्रा. करिसिद्धप्पा, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयू) कुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा आदी मान्यवर उपस्थित होते
गेहलोत उद्या बुधवारी होणाऱ्या व्हीटीयूच्या दीक्षांत समारंभात तर गुरुवारी आरसीयुच्या दीक्षांत समारंभात ते सहभागी होणार आहेत.