Saturday, November 9, 2024

/

29 रोजी ‘बेळगाव श्री -2022’ शरीरसौष्ठव स्पर्धा

 belgaum

बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने मराठा युवक संघातर्फे येत्या मंगळवार दि 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता एसएसएस फाउंडेशन बेळगाव पुरस्कृत 56 व्या ‘बेळगाव श्री -2022’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर सभागृहांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील बेळगाव श्री किताबासाठी 15,000 रुपये आणि एस. के. सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ भव्य आकर्षक फिरता करंडक असे बक्षीस पुरस्कृत करण्यात आले आहे.

प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000 आणि 1000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. बेस्ट पोझर हा किताब विजेत्या स्पर्धकास 5000 रुपये आणि आकर्षक करंडक दिला जाईल.

भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियमानुसार होणारी ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलोवरील वजनी गट अशा सात गटांमध्ये घेण्यात येईल.

शरीर सौष्ठवपटूंची वजन तपासणी स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत केली जाईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी सुनील राऊत (मो. क्र. 9620407700), संयोजक सचिव अजित सिद्दण्णावर (9844063043), बाळासाहेब काकतकर (7892430870) अथवा मारुती देवगेकर (7411446999) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.