ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा आणि त्यांच्या पतीला लाच घेतल्याप्रकरणी आता जेलची हवा खायला लागणार असून अध्यक्ष महिलेला चार वर्षे तर पतीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद आणि त्यांचे पती महावीर हुडेद यांना लाच घेतल्या प्रकरणी दोषी आढळल्याने बेळगाव जिल्हा सत्र चौथ्या न्यायालयाने लाच स्वीकारल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.पद्मश्री यांना चार वर्षे तर त्यांचे पती महावीर यांना तीन वर्षाची शिक्षा जिल्हा सत्र विशेष चौथ्या न्यायालयाचे न्यायाधीश एस व्ही विजय यांनी शनिवारी सुनावली आहे.
2017 जानेवारी महिन्यामध्ये मच्छे येथील कस्तुरी कोलकार या महिलेने अँटी करप्शन ब्युरो कडे संगणक उतारा बनवण्यासाठी ग्राम पंचायत अध्यक्षा लाच मागत असल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कडे केली होती त्यावेळी ए सी बी अधिकारी विश्वनाथ कब्बूर यांनी धाड टाकत ग्राम पंचायत अध्यक्षा पत्नी आणि पतीला रंगेहात पकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.ए सी बी अधिकाऱ्यांनी पुरावे साक्षी सादर केले त्यानुसार न्यायालयाने सदर पती पत्नीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
मच्छे ग्रामपंचायती मधून संगणक उतारा करण्यासाठी पद्मश्री हुडेद यांनी अडीच हजाराची लाच मागितली होती एसीबीच्या पथकाने धाड टाकत त्यांना रंगेहाथ पकडले होते.
भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार संघटनेचे संतोष कांबळे संतोष झवरे आणि कल्लाप्पा रामचननवर यांनी हे भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले होते
आता या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन अध्यक्षाला चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याने बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मच्छे ग्राम पंचायतीच्या तत्कालीन अध्यक्षांच्या या बातम्या ही वाचा खालील लिंक वर
लाच मागितल्याने ग्राम पंचायत अध्यक्षासह पतिला खायला लागली तुरुंगाची हवा