देशात गेल्या कांही दिवसांपासून 2000 च्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी भारत सरकारने सर्व राज्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. भारतात नव्या व्हायरसने हजेरी लावल्याचे दिसले असून कोरोनाचा नवा व्हेरीअंट म्हणजे डेल्टा आणि ओमायक्रोनपासून बनलेला ‘डेल्टाक्राॅन’ व्हेरीअंट भारतात पोहोचला आहे. देशातील कांही राज्यात या व्हेरिअंटचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
भारताच्या कोवीड जिनेमिक्स कन्सोर्टीयम (आयएनएसएसीजी) आणि जीएसएआयडीने इशारा दिला आहे की, देशात डेल्टाक्राॅनचे 568 रुग्ण तपासणीच्या टप्प्यात आहेत. कर्नाटका 221 डेल्टाक्राॅनने बाधित रुग्ण सापडल्याचे संकेत मिळत असल्यामुळे तिथे हॉटस्पॉट बनला आहे. त्यानंतर तामिळनाडू येथे 90, महाराष्ट्र 66, गुजरात 33, पश्चिम बंगाल तेलंगाना 25 आणि नवी दिल्ली येथे 20 रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
तज्ञांच्या मते हा एक सुपर -सुपर म्यूटंट व्हायरस आहे, ज्याचे वैज्ञानिक नांव बीए.1+ बी.1.617.2 आहे. तज्ञांनी सांगितले आहे कि, डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला हा एक संकरित स्ट्रेन आहे, जो गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ती प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले होते. मात्र आता ब्रिटनमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. डेल्टाक्राॅन हा कोरोनाविषाणूचा एक संकरित प्रकार असून जो डेल्टा आणि ओमायक्राॅनपासून बनला आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डेटा आणि व मायक्रोनपासून बनलेला नवीन विषाणू किती धोकादायक आहे याबद्दल अनेक संशोधने सुरू आहेत. अहवालानुसार या विषाणूंचा प्रादुर्भाव फ्रान्समध्ये जानेवारी 2022 मध्ये सुरू झाला आढि त्यावेळी पहिला रुग्ण आढळला.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) म्हणते की, ओमायक्राॅन आणि डेल्टा रीकॉम्बिनंट विषाणू पसरवत आहेत. डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हंटले आहे की, एसआरएससीओव्ही2 चे ओमायक्रोन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे. त्यांचे संक्रमन वेगाने असू शकते.