बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस अतिशय कमी होत असल्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची थेट भेट घेण्यास येत्या 21 मार्चपासून पुनश्च अनुमती देण्यात आली आहे.
हिंडलगा कारागृहातील कैद्यांना भेटू इच्छिणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसह आप्तस्वकीय, हितचिंतक आणि वकिलांना सर्वप्रथम कारागृहाच्या ई-मेल व्हाट्सअप अथवा दूरध्वनीवर संपर्क साधून नाथव नोंदणी करावी लागणार आहे.
कैद्याची भेट घेण्यास येणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कारागृहाचे मुख्य अधीक्षक
कृष्णकुमार यांच्याशी अथवा दूरध्वनी क्र. 0831 -2405275, मोबाईल क्र. 9480806475 किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कारागृह आणि सुधारणा सेवा पोलीस महासंचालकांच्या निर्देशावरून बेळगाव केंद्र कारागृहाचे मुख्य अधीक्षक शहाबुद्दीन के. यांनी केले आहे.