आसानी वादळामुळे येत्या गुरुवार आणि शुक्रवारी बेळगावमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने आसानी वादळामुळे कर्नाटकात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या अनुषंगाने येत्या गुरुवार आणि शुक्रवारी बेळगावात पर्जन्यवृष्टी होऊ शकते.
बंगालची खाडी आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगांचा गडगडाट आणि विजांसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी बेळगाव शहरात वळीवाचे आगमन झाले होते आणि वाढलेल्या घटनांमध्ये सायंकाळच्या वेळी पाऊस झाल्यानंतर बेळगाव करणार काहीसा गारव्याचा याचा सुखद अनुभव मिळाला होता.
हवामान खात्याने गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे दोन दिवसापासून रविवारी आणि सोमवारी सायंकाळी देखील हवेत सायंकाळी पावसाची चिन्हे होती आता गुरुवारी शुक्रवारी पाऊस पडतो का याकडे लक्ष लागून राहिले आहे.