कामाला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आणि विक्रेत्यांसाठी सोयीचे व्हावे यासाठी मिरज -लोंढा मार्गावर पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी यासंदर्भात बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली.
बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी खासदार मंगला अंगडी यांनी मिरज -लोंढा दरम्यानच्या पॅसेंजर रेल्वे सेवेबाबत चर्चा
करण्याबरोबरच पुनर्निर्मित नूतन बेळगाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिले.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देताना उद्घाटन समारंभाला आपण जरूर उपस्थित राहू, असे आश्वासन दिले.