चव्हाट गल्लीतील देवदादा सासन काठीच्या परंपरेला गेल्या 2013 मध्ये 200 वर्षे पूर्ण झाली. आता येत्या 16 एप्रिलला चैत्र पौर्णिमा असून तत्पूर्वी 7 एप्रिलला सायंकाळी ही सासन काठी वाजत-गाजत ज्योतिबा डोंगरावर प्रस्थान करणार असून कामदा एकादशी दिवशी म्हणजे 12 एप्रिलला सासनकाठी डोंगरावर पोहोचणार आहे.
ज्योतिबा डोंगरावर मानाची देवदादा सासन काठी पोचल्यानंतर ज्योतिबाचे पुजारी पुढे येऊन दक्षिणद्वार येथे पूजन व आरती करतात. तसेच त्यांना मानाचा विडा दिला जातो. डोंगरावरील धार्मिक विधी पार पडल्यानंतर भक्त पुन्हा चालत बेळगावला परत येतात. त्यानंतर शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिर येथे यात्रा उत्सव होतो. यात्रोत्सवाला हजारो भाविक उपस्थिती दर्शवत असतात.
चव्हाट गल्लीतून निघणाऱ्या सासनकाठीची परंपरा आतापर्यंत फक्त दोन वेळा खंडित झाली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात 1897 मध्ये प्लेगची आल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती.
त्यानंतर 2020 -21 मध्ये कोरोना महामारीमुळे यात्रेची परंपरा खंडित झाली होती. मात्र यात्रा काळात करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम त्यावेळी कोरोनाचे नियम पाळून चव्हाट गल्लीत करण्यात आले होते.