पोलिसांकडून वकिलांना झालेल्या मारबडव प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ वकीलवर्गातर्फे आज सायंकाळी कॅम्प पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे.
काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये झालेली मारामारी सोडवून शांतता प्रस्थापित करणाऱ्या वकिलांनाच कॅम्प पोलिसांनी मारबडव केल्याची घटना घडली.
सदर घटनेच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज गुरुवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याबरोबरच बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, पोलीसांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात संबंधित वकील कॅम्प पोलीस ठाण्याची गेले असता एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली गेली.
परिणामी समस्त वकिलांनी त्वरित एफआयआर दाखल करून घेतले जावे, या मागणीसाठी आज गुरुवारी सायंकाळी कॅम्प पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन छेडले.