Thursday, November 28, 2024

/

बेळगावचे 7 विद्यार्थी बंकरच्या आश्रयाला

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांसह कर्नाटकातील जवळपास 14 विद्यार्थी युद्धाचा भडका उडालेल्या युक्रेनमध्ये अडकून पडले असून बेळगावच्या 8 पैकी 7 विद्यार्थ्यांनी सुरक्षा बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.

रशियाने यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेन येथील परिस्थिती भयानक बनली आहे. नागरिकांना सुरक्षेसाठी बंकरमध्ये हालवण्यात आले आहे. कर्नाटकातील एकूण 14 विद्यार्थ्यांनाही या बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ सर्व जण वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यापैकी 8 विद्यार्थी उत्तर कर्नाटक अर्थात बेळगाव परिसरातील आहेत.

युक्रेनमध्ये निपाणी तालुक्यातील कारदगा येथील सुरज भागोजी हा एकटा बाहेर आहे, तर प्रिया छब्बी, प्रीती छब्बी, श्रेया हेरकल, अमोघ चौगुला, प्रिया निडगुंदी, रक्षीत गणी आणि अफरीन मुरादाबाद हे सात विद्यार्थी -विद्यार्थिनी सुरक्षा बंकरमध्ये आहेत. बंकरमध्ये आश्रय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसून ते फक्त पाण्यावर तग धरून आहेत.

Student

बंकरमधील विद्यार्थ्यांनी आपले फोटो आपल्या नातेवाईकांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बंकरमध्ये सुरक्षित वातावरणात विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आहेत. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनीही विद्यार्थिनींची संपर्क साधला असून त्या सुखरूप असल्याचे सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी मुलांना सुखरूप भारतात आणण्याचे आश्वासन त्यांच्या पालकांना दिले आहे. सध्या विदेश मंत्रालयाच्या संपर्कासाठी कर्नाटकचे मंत्री प्रयत्नशील आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.