Saturday, April 27, 2024

/

बेळगांवचे तीन सुपुत्र बनले ऑनररी कॅप्टन

 belgaum

भारतीय सैन्यदलात बेळगांवच्या अनेक जवानांनी नावलौकिक मिळविला आहे.यातच आता तब्बल 28 वर्षानंतर प्रथम मराठा लाइट इन्फेंट्री रेजीमेंट सेंटर प्रथम बटालियन


( जंगी पलटन) चे सूभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट राम धामणेकर हुचेंनट्टी, सूभेदार ऑनररी लेफ्टनंट बाजीराव शिंदे गणेशपूर, सूभेदार
ऑनररी लेफ्टनंट अशोक सदाशिवराव जाधव खडक गल्ली या बेळगांवच्या तीन सुपुत्रांना २६ जानेवारी 2022 प्रजासत्ताकदिनी ऑनररी कैप्टन या पदावर भारत सरकारने नियुक्त केले आहे.

कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर भारतीय लष्करी सेनेत दाखल होऊन देशसेवा बजाविणारे बेळगांवचे सुपुत्र राम धामणेकर 32 वर्ष, विनायकनगरचे सुपुत्र बाजीराव शिंदे 30 वर्ष, तर खडकगल्लीचे सुपुत्र अशोक सदाशिवराव जाधव 28 वर्ष सेवा बजावत
निवृत्त झालेल्या या तिन्ही अधिकाऱ्याना एकाच वेळी ऑनररी लेफ्टनंटपदी बढती मिळाली आहे.

 belgaum

या तिघांना ऑनररी कॅप्टन मिळाल्यामुळे बेळगावकरांची मान ताट झाली असून अशाप्रकारे फर्स्ट मराठा रेजिमेंट यांच्या इतिहासात प्रथमच 28 वर्षानंतर हा मान मिळाल्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.Honaray captain

अत्यंत कठीण व कठोर अशा अनेक ठिकाणी देशसेवा बजावून सेवानिवृत्त वरील तिन्ही अधिकाऱ्यांना जंगी फलटण मराठा रेजिमेंटचे शिपाई,यांचे परिवार यांची एन सी ओ,व जेसीओ व सर्व अधिकारी टेमलाई माता यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या
सेवानिवृत्त झालेल्या या तीन अधिकाऱ्यांना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या तिन्ही अधिकाऱ्यांना मिळालेल्या एकसाथ बढतीमुळे बेळगांव व, मराठा सेंटरचे नाव देशाच्या कानाकोप-यात आज नावलौकिक झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.