अश्लिल सीडी प्रकरणांमध्ये क्लिनचीट मिळवलेले बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोव्यामध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.
बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर रमेश जारकीहोळी यांनी पदयात्रेत सहभागी होत भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.रमेश जारकीहोळी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी आणि बिचोली मतदारसंघात अमित शहा यांच्या सोबत पदयात्रा केली.
रमेश जारकीहोळी यांनी गेल्या आठवड्या मध्ये देखील काही दिवस गोव्यामध्ये प्रचार केला होता अनेक पदयात्रेत सहभागी झाले होते.यावेळी बेळगावचे भाजप नेते किरण जाधव हे देखील उपस्थित होते.
बुधवारी गोव्याचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत रमेश जारकीहोळी यांनी अमित शहा व सावंत यांच्या सोबत प्रचार केला.
अश्लिल सीडी प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर रमेश जारकीहोळी यांची वाटचाल मंत्रीपद मिळवण्याकडे चालली असून ल काही दिवसात होणारा मंत्रिमंडळ विस्तारात रमेश जारकीहोळी यांचं मंत्रीपद निश्चित मानले जात आहे.कर्नाटक राज्यात काँग्रेस जेडीएसचे सरकार उलथवून भाजपचे सरकार बनवायला कारणीभूत ठरलेले रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी प्रकरणा नंतर मंत्रिपद गमवावे लागले होता मात्र महिन्यानंतर या प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोव्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात रमेश जारकीहोळी यांनी सक्रिय होत आपल्याला मंत्रिपद मिळणार आहेत हेच संकेत यानिमित्ताने दिलेले आहेत.
एकूणच बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंधरवड्यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत जारकीहोळी बंधुच्या विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता मात्र विधान परिषदेमध्ये असलेले भाजपचे कमी संख्याबळ आणि लखन जारकीहोळी यांनी अपक्ष म्हणून जिंकलेली विधानपरिषद निवडणूक पाहता रमेश यांना होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.