मंत्री रमेश जारकीहोळी सेक्स सीडी प्रकरणात त्यांना थोडा दिलासा मिळाल्याचे समजते.रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. जारकीहोळी यांच्या पत्राद्वारे केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी एसआयटीची स्थापना केली.
याला आव्हान देत तरुणीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवले होते. यामुळे एसआयटीचा अहवाल सादर करण्यात आला.संबंधित अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.
हा अहवाल संबंधित कोर्टापुढे सादर करण्यात येणार आहे. अहवालात काय आहे हे अहवाल सादर करण्याजवळ उघड होईल. बहुतेक रमेश यांना क्लीन चिट मिळेल, असे म्हटले जात आहे.
यापूर्वी एसआयटीच्या अहवालाचा काही भाग वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. यावर तरुणीच्या वकिलांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केला. आता न्यायालयाने एसआयटीचा अहवाल सादर करण्यास हिरवा कंदील दिला आहे. अहवालात जे आहे ते आता सर्वांनाच औत्सुक्याचे आहे.
गोवा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.माजी मंत्री रमेश जारकीहोळी व फडणवीस यांची भेट
काल झाली. भाजप नेत्यांसह गोव्याला रवाना झालेले रमेश जारकीहोळी यांनी गोवा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आहे.