मनापासून कधीच समितीशी एकनिष्ठ नसणारे,तळ्यात मळ्यात करत समितीत येतजात राहिलेले अरविंद पाटील यांची भूमिका खानापूरकरांना नवीन नाही. संधीसाधू राजकारणाचा नमुना म्हणजे अरविंद पाटील.. त्यांच्या अनेकवेळा भूमिका मराठीसाठी घातक ठरल्या…एकाबाजुला मराठी साठी झुंजणारी खानापुरची मराठी एकनिष्ठ जनता आणि एका बाजुला सत्तेसाठी हपापलेले अरविंद पाटील. त्यांची कणाहीन भूमिका अनेकवेळा खानापूरकर जनतेने अनुभवलेली आहे.
सत्तेचा सारीपाट अरविंद पाटील यांनी पटकावला आणि अनेक लाळघोटे त्यांच्या पाठीमागे फिरायला लागले. अरविंद पाटील यांची सत्ता गेली तरीही चाटू लोकं त्यांच्या पाठीमागेच हिंडत राहिले.
राष्ट्रीय पक्षाच्या सलगीने सत्तेची खुर्ची पाटील यांना खुणावू लागली आणि अरविंद पाटील यांची निष्ठा राष्ट्रीय पक्षांच्या पायाशी वाहिली गेली.माजी आमदार पाटील यांची घसट राष्ट्रीय पक्षांशी वाढू लागली. अरविंद पाटील यांच्या प्याद्यांची मात्र घुसमट व्हायला लागली. उघडपणे समितीत आणि छुपे पणाने अरविंद पाटील यांच्याशी असा अनैतिक व्यवहार चालू झाला पण हे बुरख्याआडचे सौन्दर्य मध्यवर्ती समितीचे आधार स्तंभ प्रकाश मरगाळे यांनी कालच्या बैठकीत बेनकाब करून टाकले.एकूणच अरविंद पाटील यांनी भाजपशी सलगी घरोबा केला असताना दुसरीकडे घटक समितीने याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे मात्र त्यातील काही सदस्य आजही दुटप्पी भूमिकेत आहेत असा थेट आरोप बैठकीत झाला मात्र तिथं उपस्थित खानापूरच्यव एकही सदस्यांनेभ्र देखील काढला नाही त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत होती ती स्पष्ट केली जावी अशी मागणी होत आहे.
कालच्या मध्यवर्तीच्या बैठकीत यावरुन जोरात खडाजंगी झाली. माजी आमदार अरविंद पाटील राष्ट्रीय पक्षांशी संधान बांधून असले तरीही खानापूर घटक समितीतील चाटू गिरी करणारे काही सदस्य अजूनही त्यांच्या संपर्कात आहेत, किंबहुना त्यांच्यावर कारवाई करण्यावरून दुटप्पी भूमिका घेत आहेत. वास्तविक पाहता गेल्या वर्ष भरापासून त्यांनी भाजपशी घरोबा साधलाय मात्र ते अधिकृतरित्या समितीला आपली भूमिका स्पष्ट करण्यास तयार नाहीत. ते एक मार दोन तुकडा करायला तयार नाहीत, यावर मध्यवर्ती समिती बैठकीत जोरदार वाक्युद्ध झाले त्याचे सगळीकडे बैठकीतील व्हीडिओ व्हायरल झाले.याबाबत मध्यवर्ती समितीने खानापूर घटक समितीने अरविंद पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन ठराव मध्यवर्तीकडे द्यावा अशी सूचना केली.
आता खानापूर घटक समितीतील अरविंद पाटलांच्या गमच्यातले चमचे काय भूमिका घेतात याकडे सीमा भागाचे लक्ष लागून राहिले आहे.बेळगाव तालुक्यात समितीत एकी झाली खानापूर तालुक्यात कधी एकी होणार? या एकीला कोण आड येत आहे यावर सध्या खानापूर तालुक्यातील जनता जोरदार चर्चा करत आहे.