Monday, May 6, 2024

/

बसवन कुडचीत उदे गं आई उदे चा जयघोष….

 belgaum

बेळगाव जवळील ब. कुडची येथे मरगाई देवीची मिरवणूक काढण्यात आली रविवारी सकाळी 10 वाजतानागेश स्वामी दिवटे यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरवात झाली.ऊदे ग आई ऊदे च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली.

गावातून मेन रोड ,विद्या नगर,गांधी गल्ली , तानाजी गल्ली, विठल रखुमाई गल्ली,नवी गल्ली, नागदेव गल्ली,शिवाजी गल्ली,गांधी गल्ली, बसवणंगल्ली, बस्ती गल्ली,मार्गे मिरवणूक काढून ,श्री कलमेश्वर बसवेश्वर मंदीर समोर मिरवणुकीची सांगता झाली .नंतर मूर्ती देवराज अर्श कॉलनी येथील सिद्दी विनायक मंदिरात मूर्ती ठेवण्यात आली.सकाळी गल्लो गल्ली, घरो घरी देवीची आरती करण्यात आली गावातील दोन हजार महिलांनी डोक्यावर कलश घेवून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

मंगळवारी होणाऱ्या बसवणं कुडचीतील श्री मरगाई देवीची मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रमानिमित्त मिरवणूक कडण्यात आली होती.गावकऱ्यांच्या हस्ते मिरवणुकीचे पूजा करून सुरवात केले . आमदार अनिल बेनके .नगरसेवक बसवराज मोदगेकर ,माजी नगरसेवक बसवंत हलगेकर .मंदिराचे अध्यक्ष अपूनी चौगुले,उपाध्यक्ष अनिल चौगले, नगेश स्वामी दिवटे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. B kudachi temple

 belgaum

बसवन कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमध्ये जुने प्राचीन मरगाई मंदिर काढून तिथे नवीन मंदिर बांधले आहे, त्या मंदिराचा कळसारोहन, गृहप्रवेश व वास्तुशांती होणार आहे. तसेच मंगळवारी मंदिर ची वास्तुशांती व गृहप्रवेश करून मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे, मंगळवारी सकाळी विधिवत पूजा होम हवन होणार आहे .

मरगाई देवीच्या मंदीर जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे,मंगळवारी सकाळी 6 ते 7 मंदिराची वास्तुशांती, होमपुजन होवून सकाळी 7 ते 9 श्री मरगाई देवीच्या मूर्तीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करून महाप्रसादाला सुरवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे बसवणं कुडची मंदीर पंच कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे तसेच मंगळवारी देवीच्या दागिन्यांची मिरवणूक होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.