बेळगाव महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी आणि अभियंता लक्ष्मी सुळगेकर( निपाणीकर) हे भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप बेळगाव मनपाचे महसूल अधिकारी एस बी दोडडगौडर यांनी केला आहे बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आम्लान विश्वास यांच्याकडे अर्ज करत त्यांनी हा आरोप केलाय
महापालिका आयुक्तांनी आपला कार्यक्षेत्र सोडून माजी सैनिक प्रकरण दाखल केले आहे मात्र माजी सैनिक मनपाच्या संपत्ती चे रक्षण करत आहेत. बेळगाव महापालिकेचा कार्यभार आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा तसेच आयुक्त पदी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी देखील मागणी त्यांनी प्रादेशित आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे
दोडगौडर यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत बेळगाव मनपाला आय ए एस दर्जाचा अधिकारी मिळावा अशी मागणी केली आहे या प्रकारची मागणी अनेकदा झाली होती मात्र तरी देखील बेळगाव मनपा आयुक्त पद आय ए एस कडे देण्यास दुर्लक्ष झाले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी झाली असताना बेळगाव मनपाला आय ए एस दर्जाचा अधिकारी मिळावा अशी अनेकदा मागणी करण्यात आली मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे आयएएस दर्जाचा अधिकारी दिल्यास शहराचा विकास झपाट्याने होईल आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण बसेल त्यामुळे इथे दर्जाचा अधिकारी बेळगाव मनपाला मिळावा अशी मागणी वाढू लागले.