Sunday, April 28, 2024

/

शहरात 26 पासून खुली बुद्धिबळ स्पर्धा…

 belgaum

युनियन जिमखाना लि. बेळगावतर्फे अजय चेस अकॅडमी आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने येत्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी खुल्या ऑफलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कॅम्प येथील युनियन जिमखाना येथे आयोजित केली जाणारी ही बुद्धिबळ स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा खुला विभाग आणि शालेय विभाग अशा दोन विभागात होईल. खुल्या विभागासह शालेय विभागातील प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

शालेय विभागाची स्पर्धा ‘अ’ गट (इयत्ता पहिली ते चौथी), ‘ब’ गट (इयत्ता पाचवी ते सातवी) आणि ‘क’ गट (इयत्ता आठवी ते दहावी) अशा तीन गटात घेतले जाईल.

 belgaum

सदर बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अजय धामणेकर (9632875141), निलेश भंडारी (8951045371), गिरिष बाचीकर (8050160834), आकाश मडिवाळर (8310259025) अथवा महांतेश सर (9448694256) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.