होय नाही होय नाही म्हणत अखेर मुहूर्त मिळाला असून अरविंद पाटील आता अधिकृतपणे भाजपवासी झाले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समिती मधून आमदार पद भूषविलेले खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवारी सायंकाळी बेंगलोर मध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात अरविंद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.
कर्नाटक प्रदेश भाजपा अध्यक्ष नळीनकुमार कुटील माजी मंत्री लक्ष्मण सवदी, बेळगाव भाजपचे नेते महंतेश कवटगीमठ,आमदार विश्वनाथ मामनी, माजी आमदार संजय पाटील माजी आमदार मनोहर कडोलकर यांच्या उपस्थितीत अरविंद पाटील यांनी शेकडो समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती पकडला आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून अरविंद पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत होत्या अखेर त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त मिळाला असून 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे गेल्या दोन वर्षापासून ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यापासून अलिप्त होते आणि भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते भाजपच्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांनी देखील त्यांनी विचार केला होता.
विधान कर्नाटक विधानसभेची पोटनिवडणूक असो किंवा गोवा विधानसभेची निवडणूक असो त्या निवडून त्यांनी जाहीररित्या भाजपचा प्रचार केला होता अरविंद पाटील भाजपात जाणार की नाहीत त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार की नाही याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र अखेर त्यांनी भाजपा प्रवेश केलेला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती मातृभाषे साठी लढणाऱ्या संघटने कडून आमदार की भूषवून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदार माजी आमदार अरविंद पाटील यांना ‘कोणता झेंडा तुम्ही हाती घेतला हाती’ प्रश्न विचारला जात आहे.