नो पार्किंग झोन मध्ये लावलेल्या किंवा रहदारीला अडचण ठरलेल्या गाड्यांची उचल करणाऱ्या पोलिसांना चक्क पोलिसांच्या गाडीला टो लावून उचल करण्याची वेळ बेळगाव शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार येथे आली होती.
खडे बाजार मध्ये पोलिसांची गाडीची उचल पाहून अनेक जण आश्चर्य चकित झाले होते.सदर उचल केलेली पोलिसांची गाडी रविवारी सायंकाळी पासून खडे बाजार येथील मुख्य रस्त्यावर बंद पडले होते त्याच्या अडथळ्यामुळे या ठिकाणी रहदारीला अडथळा देखील निर्माण झाला होता.
पोलीस वाहनांच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकींना दंड घालण्यात आला त्यांची उचल झाली मात्र पोलीस गाडीमुळे एक तर रहदारीला अडचण निर्माण होत होती मात्र बंद अवस्थेत अडकून पडलेली गाडी काढली गेली नव्हती शेवटी पोलिसांनी सदर पोलीस गाडीची उचल केली आणि रहदारीचा अडथळा दूर करण्यात आला.
जनतेच्या वाहनां कडून दंड वसूल करणारे पोलीस स्वतःच्या उचल केलेल्या गाडीचा दंड भरतील का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात होता.बेळगाव शहरात हेल्मेट सक्ती आणि इतर कारणे पुढे करून रहदारी पोलीस जनतेला त्रास करतात असा आरोप होतोय मात्र दुसरीकडे पोलीस गाडीची उचल होते मात्र दंड वसूल होतो की नाही हे स्पष्ट होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अश्या परिस्थितीत एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका असू नये सर्वांना समान वागणून द्यायला हवी अशीही भावना व्यक्त होत आहे.