कोरोना व्हायरस आणि ओमिक्रोन ची साखळी तोडण्यासाठी कर्नाटक राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्युची घोषणा करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री पासून सोमवारी सकाळी पर्यंत राज्यात दोन आठवड्यासाठी विकेंड कर्फ्यु असणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून शनिवार रविवार विकेंड कर्फ्यु सोबत राज्यात दोन आठवड्यासाठी नाईट कर्फ्यु देखील जारी करण्यात आला आहे. केवळ बंगळुरू मधील शाळांना सुट्टी देण्यात आली असून इतर ठिकाणी शाळा बाबत अध्याप कोणताही आदेश आला नाही.
गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रा सह देशात कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे त्या पाश्वभूमीवर अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कर्नाटक सरकारने सलग तीन तास विशेष बैठक घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला आहे परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांसाठीही rt-pcr निगेटिव असण्याची सक्ती करण्यात आली असून दोन लसीकरण करणे आवश्यक आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी ही भारत सरकारच्या सर्व नियमांचा अवलंब करावा लागणार आहे.
बेंगलोर आणि इतर कर्नाटक असे दोन स्वतंत्र नियम जारी करण्यात आले असून सध्या बेंगलोर येथील शाळा पुन्हा एकदा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंगळुरू मधील पहिली ते नववी शाळा बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.बंगळुरू मधील दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू राहतील. इतर राज्यातील नियम करणाचे आकडेवारी पाहून ठरवले जाणार असून शाळा व इतर निर्णय संदर्भात स्वतंत्र घोषणा होणार आहे.