बेळगाव जिल्ह्यात 11 जानेवारी रोजी एकूण 79 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 705 वर पोहोचली आहे.
आज सुदैवाने कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.एकूण मृतांची संख्या आता 948 वर पोहोचली आहे
सकारात्मकता दर (शेवटचे 7 दिवस) – 2.91%
आज झालेल्या चाचण्या – ४६७७
राज्य धोक्यात
राज्यात 14,473 नवीन प्रकरणे दाखल झाल्याची माहिती गांभीर्य वाढवणारी अशीच आहे. कर्नाटक राज्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची आकडेवारी आता पंधरा हजारच्या घरात जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल दिलेल्या चाचण्यांचा अहवाल उपलब्ध झाला असून 14 हजार 473 रुग्ण कर्नाटक सरकारच्या चिंतेत वाढ करणारे असेच आहेत .
बेळगाव जिल्ह्याची आकडेवारी काही प्रमाणात समतोल असली तरी ही संख्या थोपवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोना संदर्भात लावण्यात आलेले निर्बंध आता 31 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर नागरिकांनी खबरदारीने वागावे असे आवाहन कर्नाटक सरकारने केले आहे.