Friday, April 19, 2024

/

खून प्रकरणी माळमारुती पोलिसांची तिघांना अटक

 belgaum

तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. न्यायालयात हजर करून त्यांच्यावर न्यायालयीन कोठडी लागू करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुक्मिणी नगर बेळगाव येथील नोहान मोहम्मदसिरा धारवाडकर, (23) याचा खून करण्यात आला होता.गांधीनगर येथील कॉटन सर्व्हिस रोडला लागून असलेल्या एका पडक्या घरात डोक्यात, पोटात, छातीवर दगडाने ठेचून हा खून करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली होती.

माळ मारुती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक ०५/२०२२ कलम ३०२ भादंवि नोंदवून तपास करण्यात आला.

 belgaum

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मार्केट एस आर कट्टीमणी आणि पीआय सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा छडा लावत २४ तासांत आरोपींना अटक केली आहे.

इब्राहिम उर्फ इत्तू उर्फ गोचे अमानुल्ला सैय्यद (26), रा. महांतेश नगर बेळगाव , मोहम्मद जैद गुप्रान मनूरक्कर (23) रा. उज्वल नगर आणि उल्यान उर्फ दुर बद्रुद्दीन यारागहा (19) या तिघांवर खुनाचा प्रयत्न आणि खून असे 2 गुन्हे दाखल आहेत.

या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. चोवीस तासाच्या आत खुनाचा तपास लावल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.