सध्या कोरोनाचे संकट बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने शासनाने नियमावलीत काही प्रमाणात सूट दिली आहे.यामुळे केंद्र सरकारच्या बीपीएल शिधापत्रिका धारकांना वाढीव तांदूळ पुरवठा सुरू ठेवण्याची अंमलबजावणी यापुढेही सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न शिधापत्रिकाधारकातून उपस्थित करण्यात येत आहे.
कोविड आणि लॉकडाऊन मुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण बनले होते.
यामुळे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत बीपीएल शिधापत्रिका धारकांना वाढवू तांदूळ पुरवठा सुरू करण्यात आला सुमारे दोन वर्षापासून या वाढीव दराचा लाभ शिधापत्रिकाधारक नागरिकांना मिळत आहे.
याआधी नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत वाढीव तांदूळ पुरवठा करण्याची मुदत होती.मात्र याच दरम्यान ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाल्याने बीपीएल शिधापत्रिका धारकांना मिळत असणारा अतिरिक्त तांदूळ पुरवठा मार्च 2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे गोरगरीब नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.