Friday, September 13, 2024

/

पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 belgaum

राज्याच्या पदवीपूर्व शिक्षण खात्याने यंदाच्या 2022 सालातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या (पीयूसी -2) वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा येत्या शनिवार दि. 16 एप्रिल ते बुधवार दि. 4 मे 2022 या कालावधीत घेतली जाणार आहे.

यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक (अनुक्रमे वार -दिनांक, विषय आणि विषयाचा कोड नंबर यानुसार) पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 16 एप्रिल : विषय -गणित (35), एज्युकेशन (52), मूलभूत गणित (75). रविवार दि. 17 एप्रिल सुट्टीचा दिवस. सोमवार दि. 18 एप्रिल : विषय -पॉलिटिकल सायन्स (29) स्टॅटसस्टिक्स (31). मंगळवार दि. 19 एप्रिल : विषय -इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (61), रिटेल (62), ऑटोमोबाईल (63), हेल्थ केअर (64), ब्युटी अँड वेलनेस (65). बुधवार दि. 20 एप्रिल : विषय -हिस्टरी (21), फिजिक्स (33). गुरुवार दि. 21 एप्रिल : विषय -तमिळ (04), तेलगू (05), मल्याळम (06), मराठी (07), उर्दू (08), संस्कृत (09), अरेबिक (11), फ्रेंच (12).

शुक्रवार दि. 22 एप्रिल : विषय -लॉजिक (23), बिझनेस स्टडीज (27). शनिवार दि. 23 एप्रिल : विषय -कर्नाटक म्युझिक (25), हिंदुस्तानी म्युझिक (26), सायकॉलॉजी (32) केमेस्ट्री (34). रविवार दि. 24 एप्रिल सुट्टीचा दिवस. सोमवार दि. 25 एप्रिल : विषय -इकोनॉमिक्स (22). मंगळवार दि. 26 एप्रिल : विषय -हिंदी (03). बुधवार दि 27 एप्रिल… गुरुवार दि. 28 एप्रिल : विषय -ऑप्शनल कन्नडा (16), अकाउंटन्सी (30), जिओलॉजी (37), होम सायन्स (67).

शुक्रवार दि. 29 एप्रिल : विषय -कन्नडा (01). शनिवार दि. 30 एप्रिल : सोशिओलाॅजी (28), इलेक्ट्रॉनिक्स (40), काॅम्प्युटर सायन्स (41). रविवार दि. 1 मे सुट्टीचा दिवस. सोमवार. दि 2 मे : विषय -जॉग्रफी (24), बायोलॉजी (36). मंगळवार दि. 3 रमजान -बसव जयंती सुट्टी. बुधवार दि. 4 मे : विषय -इंग्लिश (02).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.