बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील लाखो भाविकांची आराध्य देवता आहे. या मंदिराला देवी दर्शनासाठी वर्षभरात लाखो लोक नित्यनेमाने भेट देत असतात.
डिसेंबर महिन्यापासून सलग चार पोर्णिमा दरम्यान होणाऱ्या यात्रेला भाविकांची सौंदत्ती डोंगरावर प्रचंड गर्दी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रभाव सुरु झाल्या नंतर श्री रेणुकादेवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर, लाखोंच्या संख्येने भक्त सौंदत्ती डोंगरावर दर्शनासाठी येऊ लागले होते. प्रत्येक दिवशी लाखो लोकांची देवी दर्शनासाठी मंदिराबाहेर रीघ लागलेली पाहायला मिळत होती. दरम्यान कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागल्याचे पाहून, श्री रेणुका देवीचे मंदिर भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यातील माघी पौर्णिमा यात्रा आहे भारता नवीनच पार पडली. त्यानंतर आता सोमवार दिनांक 17 जानेवारी रोजी देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा भक्तां विनाच पार पडत आहे.
मंदिर देवस्थान समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांच्याकडून भाविकांनी घरात राहूनच श्री रेणुका देवीची आराधना करावी.पोर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर दर्शनासाठी येऊ नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
मंदिर बंद झाल्याने, यावर्षीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे.पौर्णिमा यात्रेला आठवडाभर अगोदरच सौंदत्ती डोंगरावर भाविकांचा प्रचंड संख्येने तळ पाहायला मिळतो. मात्र यावर्षी भक्तां अभावी, सुन्यासुन्या वातावरणात श्री रेणुका देवीची यात्रा संपन्न होत आहे. भक्तांविना सौंदत्ती डोंगरावर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे.