अबनाळी ग्रामस्थांची सरकारी रेशनचे धान्य मिळवण्यासाठी खानापूर येथील जंगलातून सात कि. मी ची पायपीट नियती फौंडेशनने कमी केली आहे. भाजप नेत्या डॉ सोनाली सरनोबत यांनी रेशन पुरवठा सलग दुसऱ्यांदा थेट गावात रेशन पुरवठा केला त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे.सातत्याने केल्या जाणाऱ्या विनंतीवरून भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फौंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला आहे.
दुर्गम भागात असलेल्या अबनळी गावकऱ्यांचे जीवनावश्यक साहित्य अभावी हाल होत असल्याने त्यांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करावा अशी विनंती गावकर्यांचसह ग्रा. पं. सदस्य महादेव शिवुलकर हे सातत्याने करत होते.
त्याची दखल घेऊन भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फाउंडेशनच्या माध्यमातून अबनळी ग्रामस्थांना शासकीय रेशनचे वितरण केले.
यावेळी बोलताना डॉ. सरनोबत म्हणाल्या की, खानापूरमध्ये नियती फाउंडेशनने जनतेच्या समस्या निवारण्यासाठी खास सार्वजनिक तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. त्याद्वारे जनहिताची कामे नियती फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातील. भाजप सरकारने तसेच अन्न व वन मंत्रालयाने ग्रामीण भागातील गरजूंच्या दारापर्यंत अन्नधान्य पोचवण्याची प्रभावी योजना हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रामराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सर्व मंत्री कटिबद्ध असून ते सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी झटत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महादेव शिवुलकर, अबनळी गावचे पंच बुधाप्पा गांवकर, नामदेव गांवकर, नारायण गांवकर, दत्तू गांवकर, भाजपचे बसवराज कडेमनी, ईश्वर सानिकोप, बाळेश चन्नणावर, कुशल अंबोजी, मंजुनाथ नलवडे, महेश गुरव, राजश्री आजगांवकर, पारिश्वाड भाजप शक्तीकेंद्र प्रमुख विठ्ठल निडगलकर आदींसह अबनळी ग्रामस्थ उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका विजया पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.