Friday, March 29, 2024

/

बेळगाव भाजप बाबत कारजोळ यांचे स्पष्टीकरण

 belgaum

माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि त्यांचे बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या विरोधात बेळगाव जिल्ह्याच्या भाजप नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्याना भेटून तक्रार केल्याची बातमी समोर असतानाच रविवारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगाव जिल्हा भाजप मध्ये दुमत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

रविवारी बंगळुरू मध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. बेळगाव बेळगाव मध्ये दोन गट नाहीत ‘ते’ सगळे चहा प्यायला एकत्र जमले होते माध्यमानी बातम्या करून त्याचा आवळ्याचा भोपळा करून ठेवलाय असाही त्यांनी नमूद केलं.

वन मंत्री उमेश कत्ती यांच्या नेतृत्वात बेळगाव भाजपच्या मंत्र्यांनी आणि आमदार ने घेतलेली मुख्यमंत्र्याच्या भेटीची कल्पना गोविंद कारजोळ यांना आहे की नाही?किंवा ते बेळगाव जिल्ह्यातील या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत याविषयी त्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा सुरू झाली आहे

 belgaum

केवळ नावापुरता जिल्हा पालक मंत्री पद देण्यापेक्षा खरोखर काम करणाऱ्यांना ते तर देण्यात यावे जर का बेळगाव जिल्ह्यात असंच पुढे वातावरण राहिल्यास पुन्हा पक्षाला नुकसान होईल याबाबत प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे असेही त्यानी म्हटलं आहे.

कर्नाटक काँग्रेस मध्ये तीन गट आहेत एक गट डीके शिवकुमार दुसरा गट सिद्धरामय्या तर खरगे ,जी परमेश्वर सामनूर शिवशंकरप्पा यांचा आहे मात्र भाजप मध्ये तशी स्थिती नाही भाजप एकसंघ आहे असं ते म्हणाले. सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार गटाचे कधीच पटत नाही ते नेहमी त्यांच्यात खटके उडत असतात असेही त्यांनी नमूद केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.