Friday, October 18, 2024

/

मराठी साहित्य संमेलनांसाठी घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट

 belgaum

दरवर्षी बेळगावसह सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांच्या यंदाच्या आयोजनास अधिकृत परवानगी मिळावी यासाठी येत्या शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे.

बेळगाव जिल्हा साहित्य संघाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी हे होते. बैठकीत बेळगावसह सीमाभागात दरवर्षीप्रमाणे यंदा आयोजित केल्या जाणाऱ्या विविध गावच्या मराठी साहित्य संमेलनाबाबत चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासनाची परवानगी आदींसह अन्य बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

प्रा. आनंद मेणसे यांनी यावेळी बोलताना सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनं हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. गेली 36 वर्षे आम्ही मराठी साहित्य संमेलने भरवत असून ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची गरज आहे, असे सांगितले. बैठकीत ॲड. सातेरी, कार्याध्यक्ष गुणवंत पाटील यांच्यासह अन्य मंडळींनीही आपले विचार व्यक्त केले.Sahitya sammelan

बैठकीतील चर्चेअंती यंदाची सर्व मराठी साहित्य संमेलने सुरळीत पार पडावी यासाठी रीतसर परवानगी घेण्यासंदर्भात येत्या शुक्रवार दि. 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना त्या संदर्भात निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी साहित्य संमेलन म्हणजे आमची साहित्य जत्रा -उत्सव आहे. ही आमची संस्कृती ओळख आहे. दरवर्षी आम्ही हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे यावर्षीही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यास परवानगी दिली जावी.

सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून या संमेलनांचे आयोजन केले जाईल अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद करून संमेलनासाठी रीतसर परवानगी घेतली जावी जेणेकरून सर्व संमेलन सुरळीतपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा होईल, असे बैठकीत ठरले. गुणवंत पाटील, शिवाजी शिंदे, गौंडाडकर आदींसह संघाचे बहुसंख्य सदस्य बैठकीस उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.