बेळगावं सह सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने कशी आयोजित केली जावी याबाबत मराठी साहित्य संमेलन बेळगांव या संस्थेची बैठक मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ५.० वाजता काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शहीद भगतसिंग सभागृह , गिरीश काँप्लेक्स , रामदेव गल्ली येथे बोलावण्यात आली आहे.
मराठी संमेलन आयोजक व संस्थेच्या सभासदानी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.आनंद मेणसे,गुणवंत पाटील
वकील नागेश सातेरी,शिवाजी शिंदे,मधू पाटील यांनी केलं आहे.
माणसाला साहित्याप्रति सजग करण्याचे काम बेळगावातील मराठी साहित्य संमेलने करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात होणारी ही संमेलन वाचन लेखन संस्कृतीला बळ देतात. देशभर साहित्य संस्कृती जोपासण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.संस्कृती टिकण्यासाठी अशी संमेलने होणे गरजेचे आहे.साहित्याच्या विविध प्रकारांची निट्स पणे मांडणी लोकांना समजणे गरजेचे आहे.
ज्या देशात साहित्य,कला, संगीत, चित्रकला यांची जोपासना होते त्या देशाला संपन्न देश मानले जाते. जागतिक पातळीवर पुढारलेले देश साहित्य आणि कलेसाठी विशेष लक्ष देताना दिसतात.भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हेसुद्धा देशातील साहित्य संस्कृतीबद्दल सुचकतेने आणि अगत्याने बोलतात.ही संस्कृती टिकावी यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करते. अशी संमेलने टिकावी यासाठी बेळगावातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमी विशेष प्रयत्न करताना दिसतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील मराठी साहित्य संमेलने कशी व्यवस्थित पार पाडावीत याचा उहापोह करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या शिखर संस्थेने बैठक बोलावली आहे.