Tuesday, April 23, 2024

/

‘एन डी सीमावासीयांचे आशास्थान होते’

 belgaum

सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै.प्रा.डॉ. एन डी पाटील हे सीमावासीयाचे आशास्थान होते.असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले.

शनिवारी दि २२ रोजी शिवस्मारकात आयोजीत दिवंगत डाॅ. प्रा. कै. एन डी पाटील यांच्या शोक सभेत बोलताना व्यक्त केले.यावेळी दिवंगत नेते डाॅ प्रा. एन डी पाटील याच्या फोटो प्रतिमेला हार घालुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्रध्दांजली भाषणात सीमाप्रश्न हा कै. एन. डी. पाटील याच्या हयातीत सुटावा. अशी इच्छा होती. मात्र ही इच्छा दुर्दवाने आपुरी राहिली लोकशाहीच्या मार्गाने अनेक लढे पाटील साह़ेबाच्या नेतृत्वाखाली झाले. मात्र केंद्र सरकारने सीमाप्रश्नाबाबत अग्रेसर भूमिका घ्यायला पाहिजे होती. तशी घेतली नाही. त्यामुळे २००४ साली सीमाप्रश्नाचा दावा कै. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. तरीही तेव्हापासून त्यानी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावरील लढाई सर्वोतोपरीने प्रयत्न केले.Khanapur mes tribute

 belgaum

असे विचार अनेक मान्यवरानी केले.तसेच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिष्य म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत वंचितांना शिक्षण कसे मिळेल यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले म्हणूनच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेची धुरा अनेकवर्ष सांभाळली असे खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी श्रद्धांजली पर बोलताना व्यक्त केले, सिमाभागातील समिती व मराठी माणूस कसा एकसंघ राहील ते सतत प्रयत्नशील राहिले व आपण यापुढे एकसंघ राहून पुढील कार्य सुरू ठेवून सीमाप्रश्नाची करून घेऊया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत माजी ता.पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी केले.

यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देवापा गुरव, सचीव गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, पी. एच. पाटील,रविंद्र पाटील, संभाजी देसाई, कृष्णा कुंभार,रणजित पाटील, किरण पाटील, विनायक सावंत, राजू पाटील, रामचंद्र गावकर, अजित पाटील, दत्तू कुट्रे,संभाजी देसाई,सूर्याजी पाटील,रामचंद्र पाटील,किशोर हेब्बाळकर, आदी खानापूर तालुक्यातील म ए समितीचे नेते, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.