बेळगाव चे प्रसिद्ध उद्योजक अरविंद रावसाहेब गोगटे व 78 यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मंगल गोगटे मुलगा माधव मुलगी धनश्री सून जावई व नातवंडे तसेच आनंद व शिरीष गोगटे हे दोन उद्योजक बंधू असा परिवार आहे सद्या कोविडमुळे कोणीही भेटण्यास येऊ नये असे गोगटे कुटुंबीयांतर्फे कळविण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण पासून ते आजपर्यंत शरद पवार जयंत पाटील अशा महाराष्ट्रातील नेत्यांबरोबर यांचे जवळचे संबंध होते.
बेळगाव आणि सीमभागातील मराठी जनतेचे जिव्हाळ्याचे नाते असणारया गोगटे घराण्यातील एक कर्तबगार व्यक्तीमत्व म्हणजे अरविंदजी. अनेक मराठी संस्थांचेआश्रयदाते अशी त्यांची ओळख होती.
अरविंदजींना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी अरविंद गोगटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
#ArvindGogte
#GogteIndustrialist
#BelgaumLivenews